‘त्यांचा’ डोक्याचा स्क्रू ढिला, मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड बुक केलाय; नरेश म्हस्के यांची टीका नेमकी कुणावर?
'तुम्ही आमदारांना गद्दार म्हणतात त्याच आमदारांनी तुम्हाला निवडून दिले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या'
ठाणे : आदित्य ठाकरे यांना संजय राऊत यांनी दिलेल्या पाठिंब्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना माझे आव्हान आहे, तुम्ही आमदारांना गद्दार म्हणतात त्याच आमदारांनी तुम्हाला निवडून दिले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या. संजय राऊत पुन्हा आम्ही राज्यसभेची पोटनिवडणूक लावतो. निवडून येऊन दाखवावे. संजय राऊत यांचा डोक्याचा स्क्रू ढिला झालेला आहे उगाचच काहीही वक्तव्य करत आहेत. ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये राऊतांसाठी बेड बुक केला आहे, संजय राऊत यांनी इलाज करावा, असे म्हणत म्हस्के यांनी त्यांच्या समर्थकांना आव्हान दिले आहे.
Published on: Feb 04, 2023 03:09 PM