उबाठाने केलेला ‘तो’ गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई? संजय शिरसाट म्हणाले…

| Updated on: May 26, 2024 | 11:15 AM

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलं की, गजाजन कीर्तिकरांवर कारवाईबाबत 2-3 दिवसांत निर्णय होईल. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत करण्यावरुन गजानन कीर्तिकरांबद्दल संशय आहे, असं शिंदे गटानं पहिल्यांदाच म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

गजानन कीर्तिकर यांच्यावर पुढच्या 2-3 दिवसांत कारवाईचा निर्णय होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत केल्याची शंका आता शिंदे गटानंही व्यक्त केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलं की, गजाजन कीर्तिकरांवर कारवाईबाबत 2-3 दिवसांत निर्णय होईल. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत करण्यावरुन गजानन कीर्तिकरांबद्दल संशय आहे, असं शिंदे गटानं पहिल्यांदाच म्हटलंय. अमोल कीर्तिकर ठाकरे गटात आहेत तर वडील गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. गजानन कीर्तिकरांच्या पत्नी आणि अमोल कीर्तिकरांच्या आईनंही स्पष्ट सांगितलं की आपण अमोल कीर्तिकरांनाच मतदान केलं. तर अमोल हा निष्ठावंत आहे त्यामुळंच तो शिंदे गटात आला नाही, असं बेधडकपणे गजानन कीर्तिकर म्हणाले. त्यावरुनच, शिंदे गटानं समितीकडे प्रकरण गेलं असून कारवाईचे संकेत दिले आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 26, 2024 11:14 AM
शिंदेंना इंग्रजी येतं का? ‘त्या’ खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्र्यांचं इंग्रजी भाषेचं ज्ञान?
फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची…