Eknath Shinde गटाची माघार? ठाकरे गटाचा दसरा मेळावा ‘शिवतीर्थ’वरच होणार

| Updated on: Oct 10, 2023 | 1:41 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. दसरा मेळाव्या संदर्भात सदा सरवणकरांचे मोठं भाष्य

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजीपार्कवरच होणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी याकरता ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेस अर्ज करण्यात आला होता. मात्र आता हा अर्ज शिंदे गटाकडून मागे घेण्यात येणार आहे. तर परवानगीचा अर्ज मागे घेण्यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे पालिकेला पत्र देणार आहेत. ओव्हल क्रॉस मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाकडून या मैदानाची निवड करण्यात आली आहे. ‘दसऱ्याच्या दिवशी कोणताही वाद नको, म्हणून आम्ही आमचा अर्ज मागे घेत आहोत. मेळाव्यासाठी वाद होऊ नये म्हणून शिंदे यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला’, असे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी म्हटले.

Published on: Oct 10, 2023 01:41 PM
गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या राज ठाकरे यांच्या अटकेच्या मागणीवर मनसे नेता म्हणाला, सध्या त्यांची प्रॅक्टिस…
Ravindra Dhangekar यांचं मोठं वक्तव्य, जर पक्षाने मला विचारलं तर…