‘गाजर हलवा खाणाऱ्यांना हलवाच लक्षात येतो’, ठाकरे यांच्या टीकेवर कुणी दिलं खोचक प्रत्युत्तर
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्यानं दिलं चोख प्रत्युत्तर
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा विचार करून यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर गाजरचा हलवा दिला अशी टीका केली. तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांचं प्रश्न या अर्थसंकल्पातून सोडवण्यात आले आहे. त्यामुळे गाजर हलवा खाणाऱ्यांना केवळ गाजर हलवाच दिसतो, अशी खोचक टीका प्रत्युत्तर देताना दिलीप लांडे यांनी केली आहे.
Published on: Mar 09, 2023 10:28 PM