राजकीय समीकरणांची खिचडी अन् एक-एक मतांसाठी लढाई; 2024 ला आघाडी की बिघाडी?

| Updated on: Oct 22, 2024 | 12:00 PM

महायुती, महाविकास आघाडी यासोबत तिसरी आघाडी, मनसे, वंचित आघाडी आणि मनोज जरांगे फॅक्टर राजकीय मैदानात आहेत. यंदा इतकी राजकीय समीकरण असताना अनेक जागांवर निकालाची गणितं रंजक असण्याची चिन्ह सर्वाधिक आहे.

तीन विरूद्ध तीन अशा दोन आघाड्या यंदा एकमेकांच्या विरोधात आहे. तर इतरही काही घटक स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची भाजप सोबत महायुती विरूद्ध ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या महाविकास आघाडीसोबत यंदा प्रमुख लढत होणार आहे. मात्र त्यात तिसरी आघाडी, मनसे, वंचित आघाडी आणि मनोज जरांगे फॅक्टर यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडेल? याबाबत मोठी उत्सुकता आहे. २०१९ मध्ये वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. यंदाही राजकीय खिडचीमुळे एक-एक मतांसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये ३७ जागांवर जय-पराजयाचं गणित फक्त ५०० ते ५ हजार मतांनी बदललं. काँग्रेसने जवळपास ५ हजार मतांच्या फरकानंच चार जागा जिंकल्यात. शिवसेनेने त्या फरकाने चार जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी ८ आणि भाजपला १८ जागांवर निसटता विजय मिळाला. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 22, 2024 12:00 PM
‘ते’ एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले अन् कोणावर केला हल्लाबोल?
विधानसभेच्या तोंडावर पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?