शिवतारेंना आम्ही उमेदवारी देणारच नाही, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Mar 24, 2024 | 5:54 PM

विजय शिवतारे यांनी घेतलेल्या बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या पावित्र्यावर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल असेही त्यांनी म्हटले.

विजय शिवतारे यांना आम्ही उमेदवारी देणारच नाही, आम्ही युती धर्म पाळणार, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. विजय शिवतारे यांनी घेतलेल्या बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या पावित्र्यावर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल असेही त्यांनी म्हटले. ज्यांना हा महायुतीचा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावे त्यासाठी आमची काही हरकत नाही. त्यांना आम्हा पाठिंबा नसणार आहे. कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही. पण जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. पण जर एखाद्याने पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तर तो स्वतंत्र आहे. पण जर अद्याप पक्षात असेल तर त्याला महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.

Published on: Mar 24, 2024 05:54 PM
‘हा विंचू आधी आम्हाला डसला, आता महादेवाच्या पिंडीवर…’, शिवतारेंचा कोणत्या पवारांवर हल्लाबोल?
आता थेट घोषणा, कामाला लागा… लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय