गुवाहाटी… रेल्वे अन् विमान तिकीट, शहाजीबापू आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

| Updated on: Nov 12, 2024 | 11:18 AM

सोलापूर येथील सांगोला येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. उद्धव ठाकरे यांनी यासभेतून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सोलापूर येथील सांगोला येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगोल्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेल्या गर्दीची चर्चा होत असताना त्यावरून आरोप-प्रत्यारोपही होतायंत. ‘रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. २३ तारखेंचं एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊद्या. काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच झाडं मोजत बसूद्या’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. दरम्यान, यावर शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केलाय. तर आठ तालुक्यातून उद्धव ठाकरे यांनी गर्दी जमवली असल्याचा दावा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलाय. सांगोला येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे दिपक साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापू पाटलांना ९९ हजार ४६४ तर शेकापच्या अनिकेत देशमुख यांना ९८ हजार ६९६ मतं मिळाली होती. यावेळी शहाजीबापू पाटील यांचा अवघ्या ७६८ मतांनी विजय झाला होता.

Published on: Nov 12, 2024 11:18 AM