‘तर आमचा मुख्यमंत्री झाला असता का?’, संजय गायकवाड यांचं ‘त्या’ टीकेला जशाच तसं प्रत्युत्तर
VIDEO | 'खोक्याने नाही तर डोक्याने सत्ता बदलली', संजय गायकवाड यांनी केली सडकून टीका, काय म्हणाले बघा व्हिडीओ
मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी चांगलंच घेरले आहे. शेतकऱ्यांबद्दल राज्यसरकारमध्ये कोणतीही काळजी दिसत नसून उदासिनता असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसातून शेतकरी सावरत नाही. किमान झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची संधी द्या…’, असे गायकवाड म्हणाले. तर सामना या वृत्तपत्रातून देखील शिंदे यांच्या शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल करण्यात आला आहे. ५० खोके आणि ४० डोके, या ४० डोक्यांचा कशाचाही संबंध नाही तर केवळ खोक्यांशी संबध, अशी टीका करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. याला देखील संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.