शिरूरचा शिमगा, कोल्हे Vs दादा; अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर ‘लाव रे तो व्हिडीओ’नं अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर
राजकारण हा त्यांचा पिंड नाही, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. तर या टीकेवर उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर करत जशास तसं उत्तर दिलंय. सोलिब्रिटीला खासदार करून चूक झाली?
मुंबई, ५ मार्च २०२४ : शिरूर मतदारसंघात सध्या कलाकार या शब्दावरून कल्ला सुरू आहे. गेल्यावेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देणं चूक होती. राजकारण हा त्यांचा पिंड नाही, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. तर या टीकेवर उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर करत जशास तसं उत्तर दिलंय. सोलिब्रिटीला खासदार करून चूक झाली, असे म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. राजकारण हा त्यांचा पिंड नाही ते राजीनामा देणार होते, असे अनेक दावे करत अजित पवार यांनी टीकास्त्र डागलं. मात्र त्या टीकेच्या काही तासाच अजित पवार गेल्या लोकसभेत अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय म्हणत होते, त्याचे व्हिडीओच कोल्हेंनी ट्वीट करून उत्तर दिलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून यंदा अमोल कोल्हे यांचं नाव जवळपास निश्चित आहे. मात्र महायुतीचं उमेदवार अद्याप ठरलेला नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेत असलेले आढळराव पाटील यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवार बनतील अशी चर्चा आहे.