नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते…, फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात

| Updated on: May 06, 2024 | 5:25 PM

'अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून एकदा नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप निघालं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत', नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हेंवर देवेंद्र फडणवीसांनी डागलं टीकास्त्र

शिवाजीराव आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही पण अमोल कोल्हे हे नाटकी आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर अमोल कोल्हेंना रडता येतं, जुमलेबाजी करता येते असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आहे. ‘अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून एकदा नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप निघालं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत. शिरूरची जनता हुशार आहे. अमोल कोल्हे लोकांमध्ये गेले की त्यांचं जंगी स्वागत होतंय. त्यांना वाटतं वा काय स्वागत होतंय. मात्र जनता नंतर हळूच विचारते की खासदार साहेब पाच वर्षे कुठे होतात?, असं म्हणत फडणवीसांनी कोल्हेंवर निशाणा साधला आहे. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Published on: May 06, 2024 05:25 PM
उद्धव ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
100 टक्के नाराजी दूर… बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटील हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मैदानात