बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री… अमोल कोल्हेंचं आयोगाला पत्र, नेमकं काय म्हटलं?
लोकसभेचा चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे. १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात ११ जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये शिरूर या जागेवर देखील मतदान होणार आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवणारे उमेदवार अमोल कोल्हें यांनी आयोगाला एक पत्र लिहिलंय.
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून चौथा चप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे. १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात ११ जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये शिरूर या जागेवर देखील मतदान होणार आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवणारे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून अमोल कोल्हे यांनी पीडीसीसी बँक आणि भैरवनाथ पतसंस्थेबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडिसीसी बँक सुरू होती. या बँकेत पैसे वाटप झाला, असा आरोप विरोधकांनी केला होता. बारामतीप्रमाणे शिरूरमध्येही पैसे वाटप होण्याची शक्यता आहे, असे कोल्हेंनी म्हटले. इतकंच नाहीतर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही आरोप केले आहेत.
Published on: May 10, 2024 05:29 PM