लोकसभेत विजय मिळवल्यानंतर अमोल कोल्हेंचा अजितदादांना खोचक टोला, मी फार लहान….
डॉ. अमोल कोल्हे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. अमोल कोल्हे यांनी साधारण १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे. लोकसभेत मिळवलेल्या विजयानंतर अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. अमोल कोल्हे यांनी साधारण १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे. लोकसभेत मिळवलेल्या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मी फार लहान कार्यकर्ता आहे. मोठ्या नेत्यांना काय सांगणार असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. तर सातत्याने जनतेसाठी कामं सुरू आहे. यामध्ये पुणे-नाशिक, पुणे-नगर, तळेगाव चाकण शिक्रापूर हे तीन कॉरिडॉर मार्गी लावणार आहे. यासह आणखी काही महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे त्यासाठी काम करायचे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तर आता पूर्णपणे जनतेची सेवा करणार असल्याचे सांगत असताना सिरीअलमधून आता रामराम असंही अमोल कोल्हे यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले.