चिन्ह वेगळं पण नावात साम्य, ‘तुतारी’वरून संभ्रम होणार? अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

| Updated on: May 01, 2024 | 11:16 AM

शिरूरमधील एका उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. या ट्रम्पेट चिन्हाचं मराठी भाषांतर करून त्याला तुतारी नाव देण्यात आलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं चिन्ह देखील तुतारी वाजवणारा माणूस आहे. या दोन्ही चिन्हाच्या नावात साम्य असल्याने संभ्रम निर्माण होणार?

बारामती मतदारसंघानंतर शिरूरमधील एका उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. या ट्रम्पेट चिन्हाचं मराठी भाषांतर करून त्याला तुतारी नाव देण्यात आलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं चिन्ह देखील तुतारी वाजवणारा माणूस आहे. या दोन्ही चिन्हाच्या नावात साम्य असल्याने संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. बारामती, माढा यानंतर आता शिरूरमध्येही तोच प्रकार निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळाले. शिरूरमध्ये एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय. मात्र यानंतर अमोल कोल्हे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला पराभव दिसत असल्याने रडीचा डाव सुरू असल्याचा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केला. शिरूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना तुतारी वाजवणारा माणूस तर मनोहर वाडेकर यांना तुतारी चिन्ह देण्यात आलंय. त्यामुळे मनोहर वाडेकर हे लोकसभेच्या रिंगणात तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत.

Published on: May 01, 2024 11:16 AM
दोन दिवसात सहा सभा… मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींचा काँग्रेसवर घणाघात काय?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी लढत, संजय निरूपमांना तिकीट नाही, तर कुणाला मिळाली संधी?