Special Report | अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीक वाढली? ‘त्या’ पुस्तकानं वेधलं सगळ्यांचं लक्ष
VIDEO | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, भाजपशी जवळीक वाढली? कोल्हे यांच्या हातातील 'त्या' पुस्तकाने चर्चांना उधाण, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर आता शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान ट्विटरवर अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे या सर्व चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात. पण या शुभेच्छा देताना त्यांच्या हातातील त्या पुस्तकाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ते पुस्तक होतं द न्यू बीजेपी. अमोल कोल्हे यांच्या या फोटोमुळे ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी मारणार का? अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. अमोल कोल्हे २०२४ मध्ये भाजपकडून लढणार का? २०२४ मध्ये शिरूरमधूनच लढणार का? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता त्यांच्या हातात असलेल्या त्या पुस्तकाने पुन्हा एकदा सर्वांना कोड्यात टाकलंय, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट