शिवजयंतीनिमित्त पुण्यात साकारला शिवनेरी किल्ल्याचा देखावा अन् रंगले मर्दानी खेळ

| Updated on: Mar 10, 2023 | 10:47 AM

VIDEO | कोथरूड परिसरात आज श्रीमान योगी प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन, बघा व्हिडीओ कसा आहे उत्साह

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. १९ फेब्रुवारी रोजी गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. काही शिवप्रेमी तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजंयती साजरी करतात. त्याचाच उत्साह आज पुण्यासह राज्यभरात पाहायला मिळत आहे. पुणे शहरात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे, कोथरूड परिसरात आज श्रीमान योगी प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवनेरी किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला, यावेळी महिलांनी शिवाजी महाराजांचा पाळणा गायन करून शिवजन्मोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळ, शिवाय शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Published on: Mar 10, 2023 10:47 AM
नामांतराविरोधात छ. संभाजीनगर बंदची हाक; मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली
त्यांचा पक्ष इतका मोठा नाही आणि…, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले