‘यातून वेगळं राजकारण दिसतंय’, मिलिंद नार्वेकरांना शिवसैनिकांनी पाठवलेलं ‘ते’ पत्र व्हायरल
शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेलं एक पत्र आता चांगलंच व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर दिली आहे. यातून वेगळं राजकारण दिसून येत आहे. मविआ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करत असेल तरच त्यांनी प्रचार प्रमुख बनावं, असही शिवसैनिकांनी म्हटलंय.
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.’, असे शिवसैनिकांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे. तर लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ आपल्या गळ्यात घालतील आणि त्यांचा फायदा करून घेतील… मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहावं जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी….’ असेही पत्रात म्हटले आहे.