‘हा माझा शिवसैनिक’, वर्धापन दिनासाठी शिवसैनिकांना भावनिक साद
VIDEO | वर्धापन दिनासाठी शिवसैनिकांना भावनिक साद घालणारे पासेस, नेमका काय म्हटलंय पासेसवर?
मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून सुरू आहे. दरम्यान, कालच शिवसेनेची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. तर दुसरीकडे सर्वसामान्य शिवसैनिक या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हजर राहणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष असे पास तयार करण्यात आले आहेत. हे पासेस शिवसैनिकाना शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी देण्यात येतील. या पासेसवर हा माझा शिवसैनिक असा उल्लेख करण्यात आला आहे. तर या पासेसवर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘हा माझा शिवसैनिक’ असे पासेसवर म्हणत वर्धापन दिनासाठी शिवसैनिकांना भावनिक साद घालणारे पासेस शिवसैनिकांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
Published on: Jun 13, 2023 11:41 AM