shiv sangram Vinayak mete passed away: “त्यांचं जाणं अनपेक्षित,धक्कादायक!”, अशोक चव्हाण व्यक्त
Vinayak Mete Passed Away: मराठा समाज समितीचा अध्यक्ष असताना माझी आणि त्यांची जवळीक निर्माण झाली होती. अतिशय अभ्यासू नेता होता. त्यांचं जाणं अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक आहे.
“विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) अपघाताबद्दल मलाही चॅनल मार्फतच कळलं. मराठा समाज समितीचा अध्यक्ष असताना माझी आणि त्यांची जवळीक निर्माण झाली होती. अतिशय अभ्यासू नेता होता. त्यांचं जाणं अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक आहे.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीये. विनायक मेटे म्हणजे मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे (Mumbai Pune Express Highway) वर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.