MLA Disqualification Case : शिवसेना, राष्ट्रवादीच्या अमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाची डेडलाईन, काय दिले आदेश?

| Updated on: Oct 31, 2023 | 10:53 AM

tv9 Marathi Special Report : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अमदारांच्या अपात्रतेवर आता थेट सुप्रीम कोर्टाने डेडलाईन निश्चित केली असून ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेना आणि ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा निकाल द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालाची तारीख निश्चित झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अमदारांच्या अपात्रतेवर आता सुप्रीम कोर्टाने डेडलाईन निश्चित केली असून ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेना आणि ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांचा निकाल द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात सुधारित वेळापत्रक सादर केले आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत अध्यक्ष सुनावणी संपवतील, दिवाळीमुळे सुनावणी होऊ शकत नाही. असा युक्तीवाद राहुल नार्वेकर यांच्याकडून महाअधिकाव्यक्ता तुषार मेहता यांनी केला. तर वेळोवेळी संधी देऊनही अध्यक्ष निर्णय देत नाहीत असे म्हणत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत नार्वेकरांना शिवसेनेसंदर्भात निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, असे मत उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

Published on: Oct 31, 2023 10:53 AM
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला निर्णय कोणता?
Ratnakar Gutte : आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांचं अन्नत्याग आंदोलन