Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल ‘या’ मुद्द्यांवर ठरणार

| Updated on: Jan 10, 2024 | 1:43 PM

बुधवारी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन करणार आहे. यावेळी ते ठळक मुद्द्यांचे वाचन करणार आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्या १६ तर उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदारांचं या अपात्रतेच्या निकालानं भवितव्य ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई, १० जानेवारी, २०२४ : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात आज निकाल लागणार आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन करणार आहे. यावेळी ते ठळक मुद्द्यांचे वाचन करणार आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्या १६ तर उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदारांचं या अपात्रतेच्या निकालानं भवितव्य ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल प्रामुख्याने ३ मुद्द्यांवर ठरणार आहे. पक्षाच्या घटनेच्या आधारावर मूळ राजकीय मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं, असं सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाच्या निकालात म्हटलंय. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा व्हीप लागू होणार. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीच चंद्रचूड यांनी बेकायदेशीर ठरवली. जर प्रभूंचा व्हीप लागू होणार असं ठरवलं तर १६ आमदार अपात्र होतात. घटनेच्या १० व्या परिशिष्टात पक्षांतर बंदीच्या नियमानुसार, विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात.

Published on: Jan 10, 2024 01:43 PM
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार! 3 दिवसात बसवले जाणार ‘इतके’ सोन्याचे दरवाजे
‘मला महिनाभर शिव्या खायच्या अन् मी खाणार’, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चा