हायवेला बॅनर लावून शिवसेनेचा माजी नगरसेवक शिंदे गटात; दसऱ्यापूर्वीच शिवसेनेत शिमगा

| Updated on: Sep 26, 2022 | 10:21 AM

माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या बंडानंतर आता कदम यांनीही बंड केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ही गळती रोखण्यासाठी शिवसेना काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: दसऱ्यापूर्वीच शिवसेनेत (shivsena) शिमगा सुरू झाला आहे. शिवसेनेतील गळती अजूनही सुरू आहे. आता शिवसेनेचे घाटकोपर कामराज नगरचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम (parameshwar kadam) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी इस्टर्न एक्सप्रेस हायवेला बॅनर लावून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश होताच कदम यांची विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. कदम हे वॉर्ड क्रमांक 133चे नगरसेवक होते. दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेला गळती सुरू झाली आहे. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या बंडानंतर आता कदम यांनीही बंड केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ही गळती रोखण्यासाठी शिवसेना काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Sep 26, 2022 10:21 AM
प्रायश्चित भोगावच लागणार, बोंबा मारून उपयोग नाही; महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
शिंदे-फडणवीस म्हणाले ‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ पण पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल!