प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची युती- उद्धव ठाकरे
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसंच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. “या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक पक्ष संपवून टाकणं, प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारी काही लोकं हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागली आहेत”, असं वक्तव्य या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केलं.
Published on: Aug 26, 2022 03:08 PM