लोकसभेच्या 48 पैकी 48 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी, शिवसेनेच्या नेत्याचा दावा

| Updated on: Jun 02, 2023 | 3:15 PM

VIDEO | भाजपच्या 48 जागांच्या आढाव्यावरून शिवसेनेच्या नेत्याचा इशारा

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुका लावा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं वक्तव्य केलं आहे. यावर शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी.म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. ते आयत्या मतांवर निवडून आले आहेत. सकाळी ते टिव्हीवर बोलायला आले की, लोकं चॅनल बदलतात. आता संजय राऊत यांचा लोकं तिरस्कार करत आहेत. 2024 मध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ, तेव्हा युतीच सरकार येणार आणि एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं संदीपान भुमरे म्हणाले. यानंतर आता भाजपच्या 48 जागांच्या आढाव्यावरून संदीपान भुमरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. लोकसभेच्या 48 पैकी 48 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी आहे. तर भाजपच्या 48 जागांच्या आढाव्यावरून शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी भाष्य केले आहे.

Published on: Jun 02, 2023 03:15 PM
सुनिल तटकरे यांच्या नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
संजय राऊत यांच्या ‘त्या’ रिअॅक्शनवर नितेश राणे भडकले; म्हणाले, राऊतांची जीभ…”