संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या गटात येणार? शिवसेनेच्या नेत्यानं काय केलं मोठं वक्तव्य
VIDEO | अयोध्या दौऱ्याला शिंदे गटातील आमदार आणि खासदारांच्या अनुपस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका, शिवसेनेच्या नेत्यांचं केलं खळबळजनक मोठं विधान
मुंबई : अयोध्येला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काही आमदार आणि खासदार नव्हते. शिंदेंच्या आमदारांचा एक मोठा गट अस्वस्थ आणि नाराज आहे, काहीतरी गडबड आहे, असं माझ्या कानावर आलंय, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी स्पष्टच सूतोवाच केलंय. काहीजण अयोध्येत न जाणं ही शिंदे गटातील बेदिलीची ठिणगी आहे. आगामी काळात चित्र स्पष्ट होईल, असा दावाही ठाकरेंकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले तर यासंदर्भातील प्रश्न शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला असता त्यांनी मोठं खळबळजनक वक्तव्य केले आहे. संजय राऊत ठाकरे गटात राहतात की नाही यातच मला शंका असल्याचे ते म्हणाले. तर संजय राऊत शिंदे गटात येण्यासाठी मार्ग शोधत असल्याचं मोठं वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केल्याचे पाहायला मिळालं.
Published on: Apr 10, 2023 05:53 PM