शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो तो भस्म… शिवसेनेच्या मंत्र्यांची ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका

| Updated on: Mar 11, 2024 | 12:31 PM

उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत शिवसेनेच्या मंत्र्यांची सडकून टीका केली आहे. तानाजी सावंत म्हणाले, शरद पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो, त्याचा भस्म होतो. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी केलेल्या या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे

धाराशिव, ११ मार्च २०२४ : शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. इतकंच नाहीतर तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत सडकून टीका केली आहे. तानाजी सावंत म्हणाले, शरद पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो, त्याचा भस्म होतो. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी केलेल्या या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. “१९८८ पासूनचा शिवसैनिक आमच्या घरात आहे. आमचं बाळकडू शिवसैनिक आहे. जेवढा म्हणून मी शरद पवार वाचला, जेवढा म्हणून मी शरद पवार ऐकला… जेवढा म्हणून मी प्रॅक्टिकली शरद पवार बघतो. त्या शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावरती पडतो. त्याचा भस्म होतो. ते संपून जातं. जर आपला शिवसेना पक्ष, जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधत असाल, तर तो आत्मघात ठरेल. आणि शिवसेना संपेल”, असे मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

Published on: Mar 11, 2024 12:31 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना कानमंत्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेला मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड नेमका आहे तरी कसा?