मुख्यमंत्रीपद गेल्यावर एवढं डिप्रेशन येतं पहिल्यांदा पाहिलं, ठाकरेंना ‘या’ मंत्र्याचा टोला

| Updated on: Apr 13, 2023 | 6:59 PM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात, शिवसेनेच्या या मंत्र्यानं काय केला मोठा गौप्यस्फोट

नवी मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतच्या केलेल्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वेगवेगळ्या युक्त्या लढवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. कोण कुणाला कसं रडवतं हे एकनाथ शिंदे यांनी नऊ महिन्यापूर्वी समस्त जनतेला दाखवून दिलं आहे. शिंदे हे रडत बसणारे नाहीत तर समोरच्या अगाऊपणा केला तर त्याला रडवणारे आहेत. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर एवढं डिप्रेशन येतं हे पहिल्यांदा पाहिलं असल्याचे म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी उद्धव टाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मविआ आघाडीमध्ये सध्या काहीच अलबेल सुरू नसल्याचे राज्याच्या जनतेला कळू लागलंय. याकडे जनतेचं लक्ष दुर्लक्ष व्हावं म्हणून काही लोकांचे हे उद्योग सुरू असल्याचे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Published on: Apr 13, 2023 06:54 PM
अजित पवार हे भाजपच्या वाटेवर? ‘या’ मंत्र्यानं सांगितलं, ‘त्यांच्या मनात…’
सुषमा अंधारे यांनी सुचवलं ‘भाजप’ला नवं नाव; म्हणाल्या, भाजप सोडून शोभेल ‘हे’ नाव