‘म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी परदेश दौरा रद्द केला’, उदय सामंत यांनी थेट कारणच सांगितलं
VIDEO | मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून वार-पलटवार, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर, थेट सांगितले दौरा रद्द करण्याचे कारण
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | ‘दोन उपमुख्यमंत्री काहीतरी करतील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झालाय’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात वार-पलटवार होताना दिसताय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात एक ट्वीट करत खोचक टोलाही लगावला होता. मी ट्वीट केले आणि शिंदे यांनी त्यांचा परदेश दौरा रद्द केला असेही ते म्हणाले होते. मात्र या टीकेला मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा हा २३ तारखेला रात्री दोन वाजता रद्द झाला. याचे कारण म्हणजे नागपुरात जी ढगफुटी झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आरक्षणाची आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी हे सुरू असताना महाराष्ट्रात राहणं क्रमप्राप्त असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय त्यांना घेतला. काही लोकांनी २६ तारखेला ट्वीट केलं आणि २७ तारखेला सांगितले त्ंयांच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केला. ‘