Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’ झाल्या म्हणून घरच्यांना फा@#X मारू नका…, शिवसेना नेत्याचा खोचक टोला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. इतकंच नाहीतर लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासू सुनांना अजब सल्ला दिला आहे.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. इतकंच नाहीतर लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासू सुनांनी कागदोपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला अर्जुन खोतकर यांनी महिलांना दिल्याचे पाहायला मिळाले आहे. जालन्यामध्ये गायरान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यां उपस्थित होते. या परिषदेत महिलांशी संवाद साधता ते म्हणाले, तुम्ही सर्वजणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. म्हणून घरच्यांना फा@#X मारू नका, असं अर्जुन खोतकर म्हणालेत.