संतोष बांगर यांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, ‘ही’ ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Mar 18, 2023 | 8:51 PM

VIDEO | शिवसेना आमदार संतोष बांगर यांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे आणि दमदाटी करतानाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांची शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर आणि अधिकारी एकमेकांवर अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ट्विट करत अयोध्या पोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही कारवाई करणार की नाहीत? असा प्रश्न विचारला आहे. “असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे. आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार?”, असा सवाल अयोध्या पोळ यांनी आपल्या ट्विटद्वारे केला आहे.

Published on: Mar 18, 2023 08:51 PM
जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी कांतारा स्टाईलनं आंदोलन, कर्मचाऱ्यांची भूमिका काय?
MSRTC : नव्या रुपातील ‘हिरकणी’ लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत, काय असणार वैशिष्ट्य बघा