Deepak Kesarkar यांनी थेट सांगितलं ठिकाण, शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार?
VIDEO | उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट हे दोघं सध्या दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार याकडे अवघ्या महाराष्ट्र लक्ष लागलेलं असताना, यावरूनही आता राजकारण होताना दिसतंय.
सिंधुदुर्ग, १० ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघं नेते सध्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार हे शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस आणि ओहोल मैदानावर होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला सहानभुतीच राजकारण करायचं आहे. त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यापासून कधीच रोखलेले नाही. आम्हाला त्यांच्याशी भांडायच नसत. हिंदू धर्माला शिव्या दिल्या गेल्या तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडून एक ब्र शब्द बाहेर आला नाही. शिवसेना हे माझं कल्चर नव्हत मात्र बाळासाहेबांच्या जाज्वल्य विचारामुळे मी शिवसेनेत गेलो. मात्र बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडणार असाल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार, असे म्हणत दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. तुम्ही दसरा मेळाव्याला जेवढी लोक जमावाल त्याच्या चौपट आमच्या गर्दी आमच्या दसरा मेळाव्याला होईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आणि वस्तूस्थिती सांगितली.