‘लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल…’, मंत्री गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?

| Updated on: Oct 07, 2024 | 10:55 AM

मुख्यमंत्री लाडकी बहीणेच्या कार्यक्रमावरून होणाऱ्या सरकारी खर्चावरून विरोधक सरकारला घेरताना दिसताय. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी गुलाबराव पाटील आणि काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी केलेली वक्तव्य ही चांगलीच चर्चेत आली आहे.

लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जात असल्यामुळे मतांचा मालही तसाच येणार, असं वक्तव्य करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय. तर काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असून योजना बंद करणाऱ्या पक्षाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम खर्चावरून विरोधकांनी केलेला आरोप चर्चेत आहे तर दुसरीकडे गायिका आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचं केलेलं कौतुक महायुती समर्थकांकडून व्हायरल केलं जात आहे. महायुती असे की महाविकास आघाडी निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मतं आपल्याला मिळावी, यासाठी प्रत्येक पक्ष आघाडीवर आहे. मात्र त्याच योजनेवरून नेते करत असलेला वक्तव्यावरून वाद चांगलाच रंगतोय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 07, 2024 10:55 AM
येत्या 3 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख अजित पवारांकडेच?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ‘प्रहार’, बच्चू कडूंना मोठा धक्का