‘आता ९ महिने झाले बाळ होईल, तरी किती दिवस बोलणार…’, गुलाबराव पाटील यांनी कुणाला लगावला टोला

| Updated on: Apr 11, 2023 | 8:58 PM

VIDEO | राजीनाम्याशिवाय येतच काय? शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचा कुणाला नाव न घेता खोचक टोला

जळगाव : बाबरी मशीद पाडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे तिथे नव्हते, शिवसैनिकही नव्हते असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० शिवसैनिक आमदारांना आव्हान दिलंय. आणखी किती दिवस तुम्ही भाजपचे तळवे चाटत राहणार? बाळासाहेबांचा, शिवसेनेचा हा अपमान कसा सहन करू शकता, आधी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या नाही तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या, अशी मोठी मागणीही केली. यावर शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यात चूक झाली असेल ते नक्की माफी मागतील. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि त्यांची हकालपट्टी करता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले होते. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

Published on: Apr 11, 2023 08:58 PM
‘मविआ’तील सर्वात मोठी घडामोड, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात होणार भेट
चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याची एकनाथ खडसे यांच्याकडून पाठराखण, केलं मोठं वक्तव्य