गुलाबराव पाटील यांचं संजय राऊत यांना एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले, ‘ आमच्याकडून जी मतं घेतली ती..’
VIDEO | अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी चांगलेच फटकारले, बघा काय दिलं प्रत्युत्तर
मुंबई : शिवसेनेचे सर्व नेते हे अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्येत रामाचं मंदिर उभारलं जावं आणि हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे रामाकडे एकच मागणं असेल की आम्हा सर्वांच्यामागे त्यांचा आशीर्वाद कायम रहावा, असे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तर राज्यातील सत्तांतरानंतर भाजप शिवसेनेचा हा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिवसेनेवर टीका करताना असे म्हटले की, शिंदे गटाने जी पापं केली ती धुण्यासाठी ते जात आहे. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी एका वाक्यात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले संजय राऊत यांनी आमच्याकडून जी मतं घेतली ती परत द्यावी आणि मग पाप बोलावं.
Published on: Apr 08, 2023 07:59 PM