‘हत्ती, बेडूक करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय सुरूये हे पाहावं’, शिवसेना नेत्याचा कुणाला खोचक सल्ला?
VIDEO | 'संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम', शिवसेनेच्या नेत्याकडून जोरदार हल्लाबोल, काय केली ठाकरे गटाच्या खासदारावर टीका
मुंबई : संजय राऊत यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. इतकेच नाही तर सतत माध्यमात राहणं आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांची ही वक्तव्ये आहेत, असेही शिरसाट म्हणाले. संजय राऊतांना हत्ती बेडूक करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय सुरू आहे ते पाहणं गरजेचं, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय रऊत यांना खोचक सल्ला दिलाय. तर मी संजय राऊतांना चॅलेंज करतो की आमच्या वर्धापन दिनी कोण कोण तुमच्या गटातून येणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं, असे म्हणत त्यांनी सूचक इशाराही दिला. तर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, अजित दादा किती दिवस एनसीपीत राहतील, ते तिथे नाराज आहेत, शरद पवार यांनी का काँग्रेस सोडली मग ते राहतील कशावरून, असेही शिरसाट यांनी म्हटले.
Published on: Jun 16, 2023 03:48 PM