संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर

| Updated on: Feb 08, 2023 | 3:58 PM

प्रक्षोभक भाषणाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा

मुंबई : ठाकरे गटाने नेते आणि खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे. २०१८ मध्ये संजय राऊत हे एका खासगी कार्यक्रमासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमात राऊतांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावलं होते, त्यावर सुनावणी झाली. जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर आज न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.

Published on: Feb 08, 2023 03:04 PM
सत्यजित तांबे यांनी घेतली विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ
आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय