आदित्य ठाकरे यांच्या ब्रँडिगवर कोट्यवधी रूपये खर्च कुणी केला? शिवसेना नेत्याचा रोखठोक सवाल

| Updated on: Feb 27, 2023 | 6:15 PM

VIDEO | 'आदित्य ठाकरे आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल', शिवसेना नेत्याचा थेट इशारा

ठाणे : तुमच्या दौऱ्यांसाठी आणि ब्रँडिंगसाठी गेल्या चार-पाच वर्षात कुणी खर्च केले, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेले चार-पाच वर्षे ब्रँडिंगसाठी मित्रांच्या कंपन्यांनी कोट्यवधी खर्च केले. तुमच्या सभा, आदित्य संवाद यात्रा घेण्यात आल्या. त्यासाठी एसी हॉल तयार करण्यात आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याकरिता सुशिक्षित माणसं आणण्यात आली. हे सगळे इव्हेंट तयार केले त्यासाठी खर्च लागतो ना. तो खर्च कुठून केलात. कशातून केलात. कुठल्या अकाउंटमधून केलाय. तुमचे परदेश दौरे यासाठी कुठून खर्च केला असा सवालही यावेळी नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला. तर आदित्य ठाकरे आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल. तुम्ही खोके-खोके काय करता. आधी हे जे दौरे तुम्ही केलात. त्याचा खर्च कुठून केलात, हे आधी सांगा, असे म्हणत म्हस्के यांनी थेट इशारा दिला आहे.

Published on: Feb 27, 2023 06:15 PM
2024 मध्ये स्वराज्य संघटना निवडणूक लढणार, कुणासोबत जाणार? बघा काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान तिघांवर आचारसंहितेचा गुन्हा, बघा व्हिडीओ