‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’, शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | आदित्य ठाकरे यांनाही संजय राऊत यांच्यासारखा मानसिक आजार, शिवसेनेच्या नेत्याची खोचक टीका
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडत होते, असं विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांची परिस्थिती संजय राऊत यांच्या सारखी झाली आहे. त्यांना संजय राऊत यांचा सारखा मानसिक आजार झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. असेही खोचकपणे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. ते मास लीडर आहेत. घरी मासा मेला म्हणून दार बंद करून बसणारे आम्ही नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत. आम्हाला नोटीस आली नाही ह्या लोकांना नोटीस आली होती. तेव्हा ते नरेंद्र मोदी यांच्या सोबत मिटिंगला बसले होते. आपल्या मित्रांची, नातेवाईकांच्या कोणत्या कंपनी ह्या परदेशात आहेत आणि कोणत्या नावाने आहेत हे आम्हला बोलायला लाऊ नका, सगळ्या चिठ्या आमच्याकडे आहे, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.