एक ‘नाथ’, एक न्याय बलात्काऱ्याला…, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट चर्चेत

| Updated on: Sep 24, 2024 | 12:36 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

Follow us on

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर शिवसेनेचे नेते प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एक ट्वीट केले आहे. एक’नाथ’ एक न्याय… बलात्काऱ्याला थारा नाय…असं नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. दुसरं एका ट्वीटमध्ये नरेश म्हस्के यांनी असेही म्हटले, ‘चार-पाच वर्षांच्या चिमूरड्यांवर बलात्कार करणारा अक्षय शिंदे मारला गेला तर तुम्हाला पोटशूळ उठतो, त्याला आजच्या आज फाशी द्या अशी मागणी करणारे तुम्हीच ना…. कल्याण कोर्टात नेतानाचा, महिन्याभरापूर्वीचा त्याचा व्हिडिओ दाखवून तुम्ही विचारताय की बुरखा घातलेला माणूस गोळीबार कसा करेल म्हणून? दूधखुळे आहात की काय? तुम्ही असाल, पण जनता मात्र नाही. तुमच्या भूलथापा आणि तुमचे कांगावे आता जनतेच्या लक्षात आले आहेत.’, असे नरेश म्हस्के म्हणाले तर आता एवढे गळे काढता, शंभर कोटींच्या वसुलीसाठी मनसुख हिरेनचा एन्काऊंटर झाला तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होते? दिशा सालियन, सुशांत शर्मा, पत्राचाळ असं बरंच काय काय आपल्या मागे आहे. त्यामुळे उगाच आपली नसलेली बुद्धिमत्ता दाखवू नका. लोक तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत’, असे म्हणत नरेश म्हस्केंनी विरोधकांना फटकारलं.