येत्या 3 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख अजित पवारांकडेच?

| Updated on: Oct 07, 2024 | 10:26 AM

येत्या ३ दिवसात महाराष्ट्रात नव्या राजकीय भूंकपाचे संकेत शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्याचा रोख मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दिसत होता.

येत्या आठवड्याभरात महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूंकपाची चर्चा दबक्या आवाजाची चर्चा सुरू असताना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुढच्या तीन दिवसात भूकंपाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडणार की बाहेर पाडलं जाणार? तर महायुतीचा तिसरा पार्टनर म्हणून मनसेचा समावेश होणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्यात. नीलम गोऱ्हे या सोलापूरमध्ये असताना त्यांनी असं म्हटलं की, राजकारण हे दर तीन दिवसांनी बदलतं. काही मुलाला उभं करायचं ठरवतात, पण मुलगा वेगळं बोलतो. नरहरी झिरवळांबद्दल आदर आहे पण ते मंत्रालयातून उडी मारतील हे वाटलं नव्हतं. तर पत्रकारांनी अलर्ट रहावं. ब्रेकींग न्यूज देण्यासाठी धापवळ होईल. काही जागांबद्दल तिढा असला तरी आमचे आमदार लढायला तयार आहेत. भाजपसोबत अनेक वर्षांपासून युती असल्याने त्यांच्यासोबत काहीही होणार नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 07, 2024 10:26 AM
दिल्लीत होणाऱ्या 98 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
‘लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल…’, मंत्री गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?