मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?

| Updated on: Apr 28, 2024 | 4:57 PM

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं, असं वक्तव्य देखील राजू वाघमारे यांनी केलं आहे. तर ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या, असा आरोप राजू वाघमारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता, असं वक्तव्य करत शिवसेनेचे नेते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं, असं वक्तव्य देखील राजू वाघमारे यांनी केलं आहे. तर ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या, असा आरोप राजू वाघमारे यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय. यासोबत राजू वाघमारे असेही म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा संजय राऊत यांचा डाव होता, असे वक्तव्य करत राजू वाघमारे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बघा व्हिडीओ…

Published on: Apr 28, 2024 04:57 PM
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
त्यानं लय वाटोळं केलंय मराठा आरक्षणाचं, माझा एकच विरोधक… जरांगे पाटलांचा पुन्हा हल्लाबोल