आपला भाऊ पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले आहे. तर आपला भाऊ मुख्यमंत्री व्हावा यासाठी बहिणींनी प्रयत्न केला पाहिजे, असंही आवाहन रामदास कदम यांनी महाराष्ट्रातील महिला मतदारांना केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींना रामदास कदमांनी आवाहन केले आहे. रामदास कदम म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली दिवाळी सुखकर होण्यासाठी, आपला दिवाळी चांगली जाण्यासाठी आपल्याला आर्थिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची आठवणही आपण ठेवली पाहिजे’, असं रामदास कदम म्हणाले, तर असा भाऊ पुन्हा एकदा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्या बहिणींनी प्रयत्न केले पाहिजे, अशी विनंती वजा आवाहन रामदास कदमांनी राज्यातील महिला मतदार अर्थात लाडक्या बहिणींना केलं आहे.