‘हा बेईमान आता कडवा निष्ठावान झालाय, ऐहसान फरामोश आहेस तू’, रामदास कदम आक्रमक, कुणावर केली सडकून टीका?
VIDEO | 'त्यावेळी तू जमिनीवर लोटांगण घातलं होतंस, रामदास कदम यांनी दिली 'ती' आठवण करून...', बघा व्हिडीओ
रत्नागिरी : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जहरी टीका करत भास्कर जाधव यांचा त्यांनी चिपळूणचा लांडगा असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये शिवसेना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका केली. त्यानंतर आज रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधवांबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘ हा चिपळूणचा लांडगा आहे. बाटगा अधिक कडवा आहे. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला. पुन्हा शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा शिवसेनेत आला. हा बेईमान आता रामदास कदमपेक्षा कडवा निष्ठावान झालाय. हा ऐहसान फरामोश आहे. १९९५ ला तुला तिकिट कुणी द्यायला सांगितलं होतं? मी सांगितलं होतं बाळासाहेब ठाकरेंना. त्यावेळी तू जमिनीवर लोटांगण घातलं होतंस.. अशी आठवण रामदास कदम यांनी करून दिली.