तर बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं असतं, रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्यावर गरजले
VIDEO | योगेश कदम यांना कसं संपवायचं या कटात उद्धव ठाकरेंचा सहभाग, असे म्हणत रामदास कदम यांनी सांगितला २००९ मधला किस्सा...
रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, मी सोनिया गांधी यांच्या सोबत कधीच जाणार नाही. पण तुम्ही काय केलं. मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विचारांशी बेईमानी का केली? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी रामदास कदम म्हणाले, २००९ मध्ये मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून मला पाडलं, मी त्यावेळी दापोली मधून तिकीट मागितली असताना मला गुहागरमधून तिकीट दिलं आणि मला पाडलं. यावेळी आपल्या नेत्याला सांगून तुम्ही मला पाडलं. उद्धव ठाकरे यांनी मला त्यावेळी गाफिल ठेवलं आणि धोका दिला. तर का त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. राज्याचा विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री होऊ शकतो. कदाचित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं असतं. पण तसं होऊ नये म्हणून २००९ मध्ये तुम्ही मला पाडलं, असं का केलं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे उत्तर मागितले. इतकेच नाही तर त्यांच्या नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दापोलीतही योगेश कदम यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.