‘हे खोके खोके म्हणतात ना, अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी किती खोके दिले’, शिवसेना नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | 'काही तरी खातं द्यावं म्हणून मला उद्धव ठाकरे यांनी खातं दिलं होतं', काय केला शिवसेना नेत्यानं गंभीर आरोप
रत्नागिरी : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्या मुलालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटींचा विकास निधी दिला. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे 50 खोके दिले, असं विधान करत रामदास कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच रामदास कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खेडमध्ये माझ्या मुलाची कामे चांगली आहेत. जवळजवळ 50 कोटी.. त्यांच्या भाषेत 50 खोके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमला विकास कामासाठी दिले आहेत. विकास कामे दिली आहेत. त्यामुळे विकास केला तर लोक पाठिशी उभे राहतात. लोकांना विकासाशी मतलब असतो. लोकाना आणखी काय हवंय? असा सवाल त्यांनी केला. हे खोके खोके म्हणतात ना… उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात किती खोके दिले ते सांगा, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.