भाजपनं केसानं गळा कापू नये… रामदास कदम भडकले अन् भाजपच्या मंत्र्यालाच दिला इशारा

| Updated on: Mar 07, 2024 | 1:49 PM

रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, भाजपने केसानं गळा कापू नये, असे म्हणत शिवसेनेचे नेते रामदास कदम हे भडकल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे, असेही त्यांनी म्हटले

मुंबई, ७ मार्च २०२४ : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, भाजपने केसानं गळा कापू नये, असे म्हणत शिवसेनेचे नेते रामदास कदम हे भडकल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे, पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आलेत, त्यांचा केसानं गळा कापू नये, भविष्यात वेगळा संदेश भाजपमधून जात आहे, याचं भान भाजपच्या काही नेत्याना असावं, असे म्हणत रामदास कदम यानी भाजपवर आगपाखड केली तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युती असताना गुहागरमध्ये भाजपकडून पाडण्यात आलं असे म्हणत रामदास कदम यांनी सांगितले की, ‘माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि काही भाजप कार्यकर्ते स्थानिक आमदारांकडून भूमीपूजन, उद्धाटनाचे कार्यक्रम हेतूपुरस्सरपणे करताय. असे असेल तर भाजपवर कुणीच विश्वास ठेवणार नाही’, असे रामदास कदम म्हणाले तर रामदास कदम यांनी केलेल्या घणाघातावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघा काय म्हणाले राणे…?

Published on: Mar 07, 2024 01:49 PM
‘EVM ऐवजी मतपत्रिकेवर यंदा निवडणुका?’, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
‘लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात’, जाहीर सभेतून कुणाला दिला थेट इशारा?