शिवसेनेच्या नेत्यानं टीका करणाऱ्यांना दिलं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘रावण कोण? राम कोण?’

| Updated on: Apr 08, 2023 | 11:29 PM

VIDEO | शिवसेनेच्या या नेत्यानं सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण; म्हणाले, 'आम्ही अयोध्येला आलो कारण...'

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असताना विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. तर विरोधकांच्या या टीकेला सत्ताधारी गटातील मंत्र्यांपासून नेत्यांनी विरोधकांना जशाच तसे प्रत्युत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते म्हणाले, आम्ही शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून अयोध्येला आलो आहोत असे म्हटले. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंपासून नाना पटोले यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले, आम्ही अयोध्येला आलो कारण, शिवसेना प्रमुखांची दोन स्वप्नं होती. त्यातील पहिलं स्वप्न म्हणजे 370 कलम रद्द करण्यात आले आणि अयोध्येत राम मंदिर उभारणी करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं होती. ती स्वप्न आता पूर्ण होत असल्याचेही राम कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी ती स्वप्नं पूर्ण केली आहेत असंही आवर्जून सांगितले.

Published on: Apr 08, 2023 11:29 PM
आरपीआयचा महामेळावा, जय्यत तयारीसह सोमय्या मैदानात कसंय शक्तिप्रदर्शन?
उद्धव ठाकरे स्वत:चं पाप धुण्यासाठी अयोध्येला आले होते, आम्ही मात्र…; रामदास कदम यांचा टोला