राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला तब्बल 11 लाख…, शिंदेंच्या आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ

| Updated on: Sep 16, 2024 | 5:30 PM

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावरून संताप व्यक्त करत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन् प्रवक्ते संजय गायकवाड यांचं एक धक्कादायक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. नुसतं चर्चेतच नाहीतर त्यानं एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. हे बक्षीस जाहीर करण्यात येणार अशी घोषणा करताना संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना १०० टक्के आरक्षण संपवायचं आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून विरोध आणि संताप व्यक्त केला जात आहे. “राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केल्याने, त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे. यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली आहे. आपण मागासवर्गीय आणि ओबीसींचे हाल पाहत आहोत. आज त्या समाजाला आपल्यासोबत आणायची गरज आहे. त्यांचे दुःख, आणि आत्मियता यातून हे स्टेटमेंट समोर आले आहे”, असं संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 16, 2024 05:30 PM