विजय वडेट्टीवार भाजपात जाणार की शिवसेनेत येणार? संजय शिरसाट यांच्या दाव्यानं चर्चा
4 जूननंतर भाजपवासी होण्याची वडेट्टीवार यांनी तयारी करावी. वडेट्टीवार जिथून निवडून येतात तिथूनच महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे, असा मोठा दावा नितेश राणे यांनी शुक्रवारी केला होता. नितेश राणे यांच्या दाव्यानंतर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार हे लवकरच कोलांटी उडी मारणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले. दरम्यान, विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत येणार हे आम्ही ठरवू, असंही संजय शिरसाट यांनी म्हटले होते. तर संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनीही मोठा दावा केला होता. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत. त्यात विजय वडेट्टीवार यांचंही नाव असेल. 4 जूननंतर भाजपवासी होण्याची वडेट्टीवार यांनी तयारी करावी. वडेट्टीवार जिथून निवडून येतात तिथूनच महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे, असा मोठा दावा नितेश राणे यांनी शुक्रवारी केला. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाहीतर निवडणुकीच्या काळात आम्हाला काँग्रेसमधील अदृश्यशक्तींनी मदत केलीय, असा गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केला.