Sanjay Shirsat यांचा विरोधकावर हल्लाबोल; म्हणाले, ‘जोड्यानं या लोकांना मारलं पाहिजे’

| Updated on: Sep 02, 2023 | 7:07 PM

VIDEO | जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झालेली घटना संतापजनक म्हणत संजय शिरसाट यांचा विरोधकांवर घणाघात, 'सरकारची आरक्षण देण्याची तयारी, तर मराठा समाजाचा सर्वाधिक तिरस्कार उद्धव ठाकरे यांनी केला'

छत्रपती संभाजीनगर, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी काल शुक्रवारी लाठीमार केला. या घटनेत पोलीस आणि आंदोलक दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेवर बोलताना शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. संजय शिरसाट म्हणाले, ‘काही लोक समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. काही नालायकांनी कार्टून काढून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. सरकारची आरक्षण देण्याची तयारी आहे. तर मराठा समाजाचा सर्वाधिक तिरस्कार उद्धव ठाकरे यांनी केला’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला. पुढे ते असेही म्हणाले, मराठाला समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शिंदे सरकार स्वस्थ बसणार नाही, असा शब्द देत आश्वासनही संजय शिरसाट यांनी दिलं.

Published on: Sep 02, 2023 07:05 PM
IMD Weather | कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासात कसा होणार पाऊस?
‘आमच्याकडे बायको नांदत नाही, असे पण लोक येतात’, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?