संजय राऊत यांना सायलेंट झोनमध्ये भरती करायचे कारण…, ‘या’ शिवसेना नेत्याल्या संजय राऊत यांची काळजी !
VIDEO | संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती, ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाही म्हणून आम्ही घेतोय, कोणत्या शिवसेना नेत्याला लगावला टोला?
ठाणे : संजय राऊत यांना सायलेंट झोनमध्ये भरती करायचे आहे, त्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, असे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले असून संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षाचा जबाबदार नेता आहे, जो पक्ष बुडवायला निघाला आहे त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या तब्येतेची आम्हाला काळजी आहे. ते तर त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाही म्हणून आम्ही ती घेतोय. संजय राऊत सायलेंट झोनमध्ये असावे त्यांनी कोणताही आवाज करू नये, असे म्हणत संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय शिरसाठ यांना एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पुण्यात पोटनिवडणूक होत असून, त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मोठे यश मिळावं यासाठी मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि मला खात्री आहे की त्यांना नक्की यश मिळेल.